Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

फिल्मी घडामोडी

फिल्मी घडामोडी

मुंबई-पुणे-मुंबई हे नाव तस नवीन राहिलेले नाही. कुठल्याही चित्रपट शौकिनाला झोपेतून उठवल तर हे चित्रपटाचे नाव आहे, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे हे या चित्रपटातील नायक आहेत असे सांगून मोकळे होईल. त्यापाठीमागचे कारण म्हणजे पहिला, दुसरा असा भाग करुन या चित्रपटाने याच शिर्षकात तिसर्‍या भागावर उडी घेतलेली आहे. 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रथम ओळख, नंतर मैत्री, प्रेमप्रकरणातून विवाहबद्ध आणि आता कौतुंबीक अशा सोहळ्यात ही जोडी दाखल झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेमध्ये डोहाळे जेवणाला आजही महत्त्व दिले जाते. अर्थात त्याचे स्वरुप आज बदललेले आहे. त्याला आलिशान हॉटेलची पार्श्वभूमी लाभलेली आहे. इव्हेंट म्हणावेत असे हे सोहळे साजरे केले जातात. त्यावेळीचा तो कौटुंबीक माहोल, नातेसंबंध, चित्रपटाचे दिग्दशक सतीश राजेवाडे यांनी पुन्हा या चित्रपटात आणलेला आहे. त्यामुळे डोहाळे जेवण हे प्रेक्षकांचे खास आकर्षण असणार आहे. बाबा मी होणार गं, कोणी येणार गं असे काहीसे हे गीत असणार आहे जे नवीन ट्रेन्ड प्रस्तापीत करणार आहे. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंबेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले, मंदार आपटे यांनी ही गीते गायिलेली आहेत. निलेश मोहरीर याने त्याला संगीत दिलेले आहे. 
8 नोव्हेंबर हा दिवस दोन गोष्टींसाठी भारतीय नागरिकांना लक्षात राहतो. एक म्हणजे पु ल देशपांडे यांचा वाढदिवस आणि दोन वर्षांपूर्वी याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची केलेली घोषणा ज्याची चर्चा आजही होते. बाळासाहेब गोरे यांनी याच विषयावर ‘सही है नोटबंदी’ हा चित्रपट करायला घेतलेला आहे. कथा, दिग्दर्शन त्यांचेच असून पटकथा, संवादाची जबाबदारी दिनकर पांडे, संगीत सोनू अजमेरी यांच्यावर सोपवलेली आहे. अहमद अली शेख हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकताच त्याचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला. त्यावेळी अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट उपस्थित होते.   
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support