Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

मद्यपानामुळे हृदयविकार समस्यांत वाढ

मद्यपानामुळे  हृदयविकार समस्यांत वाढ

सणासुदीला तुमच्या मेन्यूमध्ये काही ड्रिंक्सचा समावेश केल्यास आनंद द्विगुणित होतो. मात्र, त्याच वेळी, तुमचा रक्तदाब आणि कोलेस्टरॉलही वाढते आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघवडवते. प्रत्येकाला मद्यपान करणे ही उत्सवाची प्राथमिक पद्धत वाटते, परंतु त्यामुळे सणच संपुष्टात येऊ शकतात हे आपण विसरतो.
तुम्ही नियमितपणे मोठ्या प्रमाणावर मद्यपान करता तेव्हा तुमचा हृदयदर आणि श्वसनाचा वेग कमी होतो आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो (ज्याला हायपरटेंशन असे म्हणतात). काही काळानंतर, हायपरटेंशनमुळे हृदयाच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर (सीव्हीडी) आजार होऊ शकतात. शिवाय, तुम्ही सणांमध्ये जास्त कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ खाता. लाडू आणि मिठाया जास्त कॅलरीयुक्त असतात आणि त्यामुळे हृदयावर त्याचा जास्त ताण येतो. या सणांच्या कालावधीत मद्यपानामुळे काही अतिरिक्त समस्या निर्माण होऊ शकतातः
उच्च रक्तदाब : तुम्ही करत असलेल्या प्रत्येक मद्यपानासोबत रक्तदाब वाढतो. तुम्ही मद्यपान पूर्णपणे थांबवल्यास तुमचा रक्तदाब नियमित होण्यासाठी किमान 2-4 आठवडे लागतात. 
एरेथेमिआ (अनियमित ठोके)- जास्त मद्यपानामुळे अरिथेमिआ होऊ शकतो आणि त्यामुळे हृदयाच्या समस्यांचे धोके वाढतात. मद्यपान कमी केल्यास तुमच्या हृदयदाबामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते.
कार्डिओमायोपथीः जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यामुळे रक्ताचे वहन अकार्यक्षम पद्धतीने होते. 
स्ट्रोकः जास्त मद्यपान करणार्‍या लोकांना कमी मद्यपान करणार्‍या लोकांच्या तुलनेत खूप कमी वयात स्ट्रोक येऊ शकतो. रक्तवाहिन्यांना तडे गेल्यामुळे सेरेब्रल हॅमरेज होऊ शकते. याबाबत, स्त्रियांना पुरूषांच्या तुलनेत जास्त त्रास होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यामुळे प्रौढांमध्ये खूप कमी वयात मोठा स्ट्रोक बसू शकतो.
कोरोनरी आर्टरी डिसीजः फक्त मद्यपानामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज होत नाही तर जास्त कॅलरीयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे आर्टरीजचे नुकसान करू शकते.
पेरिफेरल आर्टरी डिसीजः खूप मद्यपान केल्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याची शक्यता वाढते (रक्तवाहिन्या लहान होणे) आणि त्यामुळे तुमचा रक्तदाब आणि ट्रायग्लायसेराइड पातळ्या (रक्तामध्ये सापडलेला फॅटचा प्रकार) वाढू शकतो आणि त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
कॉन्जेनिटल हार्ट डिसीज (सीएचडी)- कॉन्जेनिटल हार्ट डिसीज (सीएचडी) असलेली प्रौढ व्यक्ती तुम्ही असल्यास मद्यपान करणे सुरक्षित आहे की नाही हे विचारण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मद्यपानामुळे रक्तदाब वाढू शकतो, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि त्यामुळे आधीच असलेला हृदयविकार जास्त वाढू शकतो. 
मायोकार्डिअल इन्फार्क्शन (हृदयविकाराचा झटका)- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी सुमारे 60 लाख लोकांना मायोकार्डिअल इन्फार्क्शन होऊ शकते. तुम्ही मद्यपान जितके जास्त कराल तितके मायोकार्डिअल इन्फार्क्शनचा परिणाम जास्त गंभीर होतो.
कार्डिएक अरेस्टः अतिमद्य सेवन हे कार्डिएक अरेस्ट होण्याच्या सर्वाधिक सर्वसामान्य कारणांपैकी एक आहे. तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल तितके जास्त ते तुमच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम करेल. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
याशिवाय, मद्याच्या अतिसेवनाचे काही लघुकालीन परिणाम खालीलप्रमाणे आहेत. 
  •  नजर कमजोर होते 
  •  समन्वयाचा अभाव (मोटर स्किल्सवर परिणाम) 
  •  तोतरे बोलणे (बोलण्यात अडथळे) 
  •  मूड स्विंग्स 
  •  स्मरणशक्तीचा र्‍हास
  •  श्वासोच्छ्वास कमी होणे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support