Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरणी पालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरणी पालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

705 वरील अनधिकृत बांधकामामुळेच हल्ला!
विजय मंगलानी यांनी सहाय्यक आयुक्त पदभार सांभाळल्यापासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. वादग्रस्त 705 या राखीव भूखंडावर झालेल्या भाजपच्या कार्यालयाला तसेच या कार्यालयाच्या मागे मंगलानी यांनी बंद पाडलेले वाधवा नामक व्यक्तीच्या अनधिकृत बांधकामाला तोडण्यासाठी नोटीस देखील बजावली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगलानी हे अनधिकृत बांधकामांना विरोध करतात म्हणून त्यांची उचलबांगडी करण्याचा काही राजकीय नेत्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. प्रशासन देखील या दबावाखाली निर्णय घेण्याचा मनस्थितीत आहे. 

उल्हासनगर । प्रतिनिधी
अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यास गेलेले पालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय मंगलानी यांना भाजप नेता कपिल अडसूळ आणि त्याच्या सहकार्‍यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या सर्व कामगार संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवत कामबंद आंदोलन केले. 
उल्हासनगर कॅम्प 3 येथील शांतीनगर परिसरात गावडे शाळेसमोर अनधिकृत दुकानांचे गाळे बनविण्याचे काम चालू होते. याबाबत प्रभाग 1 चे सहाय्य आयुक्त विजय मंगलानी हे स्वतः अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाच्या कर्मचार्‍यांसह हे बांधकाम निष्कसित करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी भाजपचा जिल्हा सचिव  कपिल अडसूळ, आदिनाथ अडसूळ, महेश अडसूळ आणि 10 ते 15 अज्ञात इसमांनी या कारवाईला विरोध करीत विजय मंगलानी यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी विजय मंगलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी कपिल अडसूळ, आदिनाथ अडसूळ, महेश अडसूळ आणि त्यांच्या 10 ते 15 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
विजय मंगलानी यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कामगार संघटनांनी काही काळासाठी बंद पुकारला होता. या वेळी प्रतिक्रिया देताना मंगलानी म्हणाले की, मला या प्रकरणात पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केले, मात्र मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support