Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

भ्रष्ट अधिकार्‍यामुळे कारिवली ग्रामपंचायत अविकसित

भ्रष्ट अधिकार्‍यामुळे कारिवली ग्रामपंचायत अविकसित

भिवंडी । शंकर जाधव
तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे ग्राम विकासामध्ये अडथळे निर्माण होऊन नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या बेशिस्त, भ्रष्ट ग्रामविकास अधिकार्‍यांची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी अशी लेखी मागणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य योगेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.पुढे तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांची कार्यपद्धती भ्रष्ट, गैरव्यवहारी व जनविरोधी असल्याने स्थानिक ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी तरवारे हे आढवाड्यातून फक्त दोनच दिवस कार्यालयात येऊन दोन ते तीन तास थातूरमातूर काम करून निघून जात आहेत. त्यामुळे कार्यालयातील लिपिक, कर्मचारी व सफाई कर्मचार्‍यांवर कोणतेही अंकुश राहिलेले नाही. या अनागोंदी कारभारामुळे कर्मचारीही घरीच बसून पगार घेत आहेत. शासन निर्देशानुसार सर्वत्र स्वच्छ भारत अभियान युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. मात्र ग्रामविकास अधिकार्‍याच्या उदासीनतेमुळे ग्रामपंचायत क्षेत्रात अस्वच्छता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणची गटारे तुंबलेली आहेत. रस्त्यांची साफसफाई होत नसून जंतुनाशक पावडर व दुर्गंधी नाशक औषधांची फवारणी केली जात नसल्याने रोगराई वाढली आहे. या घटनांना ग्रामविकास अधिकारी तरवारे जबाबदार असल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. सदरचा सर्व कारभार भ्रष्ट व बेशिस्तपणाचा असल्याने या ग्रामविकास अधिकार्‍याची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच योगेश पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support