Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 19, 2018

गणपूर्ती नसताना विषयांना मंजुरी दिली कशी?

  नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा सवाल 

गणपूर्ती नसताना विषयांना मंजुरी दिली कशी?
राजाजी पथवरील समावेशक आरक्षणामध्ये महापालिकेच्या ताब्यात मिळालेली व्यायामशाळा बांधीव मिळकत संजीवनी वेल्फेअर ट्रस्टला 10 वर्षे कालावधीसाठी व्यवस्थापन करार तत्वावर चालविण्यास देणे हा विषय तहकूब सभेत ठेवण्यात आला होता. या शाळेवर पालिकेने 40 लाख इतका खर्च केला
कल्याण । प्रतिनिधी
महासभेमध्ये सदस्यांची गणपूर्ती नसताना विषयांना मंजुरी दिली कशी? गणपूर्ती नसताना सभा तहकूब करण्याऐवजी विषय मंजूर करता येतात का?, असा प्रश्न नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी उपस्थित करत सचिव संजय जाधव यांना जाब विचारला. 
आक्टोबर महिन्याच्या महासभेत 18 विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी 13 विषय सर्व नगरसेवकांच्या मंजुरीने सहमत करण्यात आले. तर गणपूर्ती नसताना 14 ते 17 विषय मंजूर करण्यात आले. आवश्यक गणपूर्ती नसताना सभा तहकूब करण्यात येते, मग सभेत विषय कसे काय मंजुर करण्यात आले? आवश्यक गणपूर्ती नसल्याचे निदर्शनास आणून देणे हे सचिवांचे काम आहे का नाही?, असा प्रश्न नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सभेत उपस्थित करत सचिव यांना जाब विचारला.
विषयांच्या मंजुरीसाठी आवश्यक गणपूर्ती असने आवश्यक असते. गणपुर्तीची बाब सचिवानी निदर्शनास आणून द्यावे असे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सभेत सांगितले. तसेच महासभा सुरू असताना एखादा सदस्य कामानिमित्त बाहेर जात असेल आणि नंतर उपस्थित राहत असेल तर त्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याची नोंद करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना दिली. त्याचबरोबर यापुढे आवश्यक गणपूर्तीचा विषय सचिवानी निदर्शनास आणून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजाजी पथवरील समावेशक आरक्षणामध्ये महापालिकेच्या ताब्यात मिळालेली व्यायामशाळा बांधीव मिळकत संजीवनी वेल्फेअर ट्रस्टला 10 वर्षे कालावधीसाठी व्यवस्थापन करार तत्वावर चालविण्यास देणे हा विषय तहकूब सभेत ठेवण्यात आला होता. या शाळेवर पालिकेने 40 लाख इतका खर्च केला असून व्यवस्थापनावर अतिरिक्त खर्च कशाला? या विषयावर हरकती घेत महापालिका डबघाईला आली असताना आर्थिक स्थितीत वाढ कशी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असताना हा दानशूरपणा कशाला, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच आजतागायत पालिकेच्या किती वास्तू जतन करून ठेवल्या आहेत, असा प्रश्न नगरसेवक मोहन उगले यांनी उपस्थित केला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support