Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 23, 2018

पोलिस, महसूलच्या दूर्लक्षामुळे पडणार मुडदे

कोल्ही-कोपर गावात रेती उपशावरून राडा
पोलिस, महसूलच्या दूर्लक्षामुळे पडणार मुडदे,कोल्ही-कोपर गावात रेती उपशावरून राडा

  पनवेल । प्रतिनिधी
पोलिसांच्या डायरीतील अतिसंवेदनशिल कोल्ही-कोपर गावात रेतीच्या गोरख धंद्यातून मिळणार्‍या दलालीवरून पुन्हा अंतर्गत वाद विकोपाला गेले आहेत. बुधवारी, एका गटाने दुसर्‍या गटाचे चार सक्शन पंप बाहेर काढून वाद उकरून काढला. पोलीस आणि महसूलला त्यांची भांडणे दिसत नसली तरी त्यातून नजिकच्या काळात मुडदे पडल्यास आश्चर्य वाटायला नको, इतकी भयानक परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. 
तीन महिन्यांपूर्वी याच कारणांवरून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली असतानाही शासकीय यंत्रणा रक्तपात होण्याची वाट पाहत आहे का?
सिडकोच्या विमानतळासाठी नियोजित खाडीत एकीकडे भरावाची कामे जोर धरू लागली आहेत. दुसरीकडे मात्र, दोन वर्षापासून जोरात बेकायदा रेती उपसा सुरू आहे. पोलीस आणि महसूलच्या कारवाईला न जुमानता एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघिवली वाडीच्या खाडीत बिनदिक्कीतपणे रेती उत्खनन सुरू आहे. 
कोल्ही-कोपर येथील खाडीत स्थानिकांच्या मदतीने वाळू माफियांना एका सक्शन पंपामागे पन्नास हजार रूपयांची दलाली घेऊन रेती उपसा करणार्‍या पंपांना परवानगी दिली गेली आहे. अनेक वेळा महसूल, पोलीस यंत्रणेने धाड टाकून रेती उपसा करणार्‍या यंत्रणा नेस्तनाबूत केल्यानंतरही त्यांच्या कारवायांना लगाम बसला नाही.
दोन दिवसांपूर्वी कोल्ही कोपर गावातील एका गटाने, आमच्या जागेत सक्शन पंप का लावले, असा प्रश्न उपस्थित करून दुसर्‍या गटाच्या यंत्रणा तोडण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर त्यांचे चार पंप आणि बोटी तिथून बाहेर काढल्या गेल्या. त्यामुळे तेथे वादाची ठिणगी पडली.  आधीच कोल्ही-कोपर हे गाव पोलिसांच्या रडारवर होते. पूर्वी पारंपरिक राजकीय वैमनस्यांतून या गावात अनेकांच्या क्रुरपणे हत्या झालेल्या आहेत. आता गावाने कात टाकली असली तरी समृद्धीच्या द्वेषातून पुन्हा अधूनमधून वाद विकोपाला जातात. रेती धंद्याला पाठिंबा आणि दलालीतून मिळणार्‍या पैशावरून अनेकदा खटके उडाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी एकाने याच रागातून कोयत्याने हल्ला चढविला होता. तो चुकविल्याने हातावर निभावले गेले, अन्यथा मान उडाली गेली असती, इतका भयानक तो वार होता.त्यानंतर पुन्हा कोल्ही-कोपरला रेती उपसावरून ठिणगी पडली आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support