Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

ठाणे जिल्हा परिषदेची डिजिटल झेप

विविध योजनांच्या प्रचार-प्रसारांसाठी संकेतस्थळाचे अनावरण
ठाणे जिल्हा परिषदेची डिजिटल झेप

ठाणे । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी, ग्रामीण भागातील जनतेसाठी राबवण्यात येणार्‍या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने डिजिटल झेप घेतली आहे. www.zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून सोमवारी या संकेतस्थळाचे अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे, समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती उज्वला गुळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर तसेच सन्मानीय पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

या संकेतस्थाळाचा उपयोग लाभार्थींना योजनेचा उद्देश, पात्रता, मंजुर निधी, लाभ मिळवणेकरीता अर्ज नमुने, अर्जाची सद्वयास्थिती यांबाबतची माहिती जनतेस मिळण्याकरता होणार आहे.

या संकेतस्थळावर डिजिटल जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, विषय समित्यांची रचना व सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य यांची गट व गण निहाय पत्ते, संपर्क क्रमांक हे छायाचित्रासह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील अडचणी, समस्या, तक्रारी यांचे निराकरण करण्याकरता जिल्हा परिषद नेहमी आग्रही राहिले असून ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने थेट व विनाखर्चात जिल्हा परिषदेच्या दरबारी मांडणेकरीता नवीन संकेतस्थळावर सुविधा पुरविण्यात आली आहे.

हे संकेतस्थळ पेस इन्फोटेक संस्थेने विकसित केले असून यासाठी विस्तार अधिकारी वैभव वायकर, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी अर्पिता वैद्य, तंत्रज्ञान  सहाय्यक अलोक मिश्राम , जिल्हा परिषद माहिती व तंत्रज्ञान सहाय्यक शुभांगी देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support