Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

सात महिने करणार मुक्काम

पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्यासह मेंढपाळ रायगडात

सात महिने करणार मुक्काम,पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्यासह मेंढपाळ रायगडात

निलेश पवार । महाड
आपल्या पोटाची खळगी भरण्याबरोबरच आपल्या मेंढ्यांच्या अन्न आणि पाण्याची सोय करण्यासाठी मेंढपाळांचे कोकणात आगमन झाले आहे. थंडीत हंगामात आपल्या गावाहून पायपीट करत निघालेल्या या मेंढपाळांचा मुक्काम कोकणात सात महिने राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरणार्‍या वरंध, ताम्हणी आणि महाबळेश्वर घाटात मेंढपाळांचे जथ्थे मेंढपाळांसह पायपीट करत कोकणात येत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातून मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्याना पाणी आणि चारा पुरवठा करताना मोठा प्रश्न निर्माण होतो. पाण्याचा आणि चार्‍याचा दुष्काळ पाहता मेंढपाळांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या मेंढ्याना जगवणे महत्वाचे असते. याकरिता कोकणातील वातावरण येथील मुबलक पाणी आणि चारा मेंढ्याना असल्याने गेली अनेक पिढ्या हे मेंढपाळ कोकणात आपल्या मेंढ्या, शेळ्या, आणि बकर्‍या घेऊन येत आहेत. थंडीच्या हंगामात कोकणात तांदुळ उपलब्ध असतो. मेंढ्यांसाठी चार्‍याची सोय असते. 
वरंधमार्गे येणारे मेंढपाळ महाड, वरंध, माणगाव तालुक्यातील लोणशी, गोरेगाव, माणगाव, ढालघर, रिळे, वावे येथे जातात तर काही अलिबाग, पेण, पाली येथे सरकतात. शेतात पाण्याच्या ठिकाणी झोपडी बांधून वास्तव्य केले जाते. मेंढ्यासोबत काही बकरेही असतात. पाच पाचच्या समुहात मेंढ्यांना चालत नेले  जाते. त्यामुळे यातून एखादी मेंढी हरवली तरी तिला मेंढपाळांच्या भाषेत हुडकली जाते. 5 ते 10 हजारापर्यंत मेंढी, बकरा विकले जाते. तर लोकरीचा दर जो गावी 5 ते 10 रूपये किलो असतो तो कोकणात तीस रूपये किलो होतो. याशिवाय दूध, तूपही विकले जाते. शेतात मेंढ्या बसवून त्यांची विष्ठा खत म्हणून वापरली जाते. यासाठी 200 रूपये आकारले जातात. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support