Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरेच!

खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरेच!

आश्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली श्याम हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती केली होती. मग ती महापालिका असो की लोकसभा शिवसेना आणि समाजवादी हातात हात घालून काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे हे जात पात मानत नव्हते. रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडली होती. डॉ. मनोहर जोशी यांना ब्राह्मण म्हणून बाळासाहेबांनी मुख्यमंत्री किंवा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडले नव्हते, तसेच नारायण राणे यांना मराठा, लीलाधर डाके -गणेश नाईक यांना आगरी म्हणून आणि छगन भुजबळ यांना माळी म्हणून नव्हे तर ते त्यांची कार्यक्षमता म्हणून त्या त्या पदावर निवडले होते. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांनी पदे देताना त्यांची कार्यक्षमता पाहून पदे दिली होती. कडवट मुसलमान साबीर शेख यांना निष्ठावंत राष्ट्रभक्त म्हणून राज्याचा कामगार मंत्री बनविला. कर्तबगारी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली होती. बाळासाहेब ठाकरे हे मुसलमान बांधवांच्या विरोधात नव्हते तर पाकधार्जिण्यांच्या ते विरोधात होते. महंमद अझरुद्दीनची म्हणूनच त्यांनी वाखाणणी केली होती. जावेेद मियाँदादसुद्धा मातोश्रीवर येऊन वाहव्वा करून गेला होता. हुसेेेन दलवाई, वसंत चव्हाण यांंच्यासह अनेकांनी या भूूमिकेचं कौतुक केलं होतं. मला आठवतं, मी त्यावेळेला अकरा वर्षांचा होतो. 19 जून 1966 या दिवशी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत शिवसेनेनं आपलं स्वरुप दाखवायला सुरुवात केली होती. बाळासाहेबांवर प्रादेशिक वादाचे आरोप होऊ लागले. शिवसेने स्थापनेच्या बरोबर आठ दिवस आधी म्हणजे साने गुरुजींच्या पुण्यतिथीदिनी 11 जून 1966 रोजी आमचे पिताश्री वसंतराव त्रिवेदी यांनी ‘आहुति’ साप्ताहिक अंबरनाथहून सुरू केलं होतं. शिवसेनेच्या स्थापनेमुळे बाळासाहेबांवर चौफेर टीका होत असतांना ‘आहुति’ मध्ये शिवसेनेचं स्वागत करणारा अग्रलेख वसंतरावांनी लिहिला होता. योगायोग म्हणजे वसंतराव त्रिवेदी यांनी सुरू केलेल्या ‘आहुति’ला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला या महिन्यात पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.शिवसेना या वर्षात आपली सुवर्ण महोत्सवी वर्षाची झंझावाती वाटचाल पूर्ण करून विक्रमी शतकी घोडदौड करण्यास सिद्ध झाली आहे. एकचालकानुवर्ती संघटनेची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये दिमाखदार नोंद ही केवळ आणि केवळ शिवसेनेचीच आहे, ज्याचा प्रत्येक मराठी, प्रत्येक हिंदु आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीला निश्चितपणे गर्व आहे. आज योगायोगाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आज आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतरही केंद्र व राज्य सरकार आणि कित्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये सत्तास्थानी आहे.  
नंदमूरी तारक रामाराव म्हणजेच एन. टी. रामाराव यांनी तेलुगु भाषेच्या अस्मितेसाठी तेलुगु देसम् स्थापन केला आणि अवघ्या नऊ महिन्यात तो आंध्र प्रदेशात सत्तेवर आणला, पण मराठी स्वाभिमान टिकविणार्‍या शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी 1966 पासून 1995 पर्यंत इतकी वर्षे वाट पहावी लागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळत असतं. 1995 ते 1999 आणि आताही निव्वळ शिवसेनेची एकहाती सत्ता नव्हती आणि नाही. 1995 ते 1999 या काळात हिंदुत्वाची शिवसेना-भारतीय जनता पक्षाची अभेद्य युतीची शिवशाहीची सत्ता होती. 25 सप्टेंबर 2014 रोजी ही अभेद्य युती तोडण्याची घोषणा झाल्यानंतर 15 ऑक्टोबर 2014 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे एकटे महाभारतातल्या कुरुक्षेत्रावरच्या अभिमन्यूसारखे लढले आणि 63 वाघ विधानसभेवर निवडून पाठविण्यात जबरदस्त यशस्वी ठरले. 288 च्या विधानसभेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते म्हणून केवळ जनमताचा कौल आणि जनादेश शिरोधार्य मानून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी जी साद घातली तिला प्रतिसाद म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थिर सरकार देण्यासाठी 5 डिसेंबर 2014 रोजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उद्धवादेशाने सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि डॉ. दिपक सावंत यांनी कॅबिनेट तसेच रवींद्र वायकर, दिपक केसरकर, विजय शिवतारे, दादा भुसे, संजय राठोड, अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सत्तेत सहभागी असली तरी शिवसेनेने जनतेशी असलेली नाळ तुटू न देता सतत जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची, बाळासाहेबांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्राप्रमाणेच आजवर भूमिका यथा योग्य पार पाडली आणि यापुढेही ही घोडदौड वायुवेगाने होणार हे निःसंशय. शिवसेनेच्या बाराही मंत्र्यांचं काम अगदी वाखाणण्यासारखं आहे. अर्थात, शिवसेनेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीचा साधा आढावा जरी घ्यायचा म्हटला तरी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधापेक्षा मोठे खंडशः ग्रंथ लिहिले तरी ते कमी पडतील. शिवसेनेने अनेक वादळे, असंख्य आव्हाने, अगणित संकटे पचवलीत, परतवून लावलीत आणि सामनाही केला. उन्हाळे, पावसाळे अनुभवले आणि आपली दाहकता, जाज्वल्य ज्वलाग्राही घणाघाती कणखर परखड विचार इतकेच नव्हे तर ज्वलंत हिंदुत्व या आभुषणांनी नटविली. या आभुषणांसमोर तकलादू कृत्रिमतेला कधीही शिवसेनेने स्थान दिले नाही. अनेक जण आले आणि गेले पण बाळासाहेबांच्या शिवसेनेला काही फरक पडला नाही. अनेकांना आम्ही म्हणजेच संघटना असा जो दर्प चढला होता त्यांना काळाने त्यांची जागा, पायरी दाखवून दिली. ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ याचा प्रत्यय आणून दिला. शिवसेना ही जगाच्या पाठीवरची अशी एकमेव संघटना आहे की ज्या संघटनेने आपल्या पन्नास वर्षाच्या यशस्वी वाटचालीत अनेकांना लाल दिवा मिळवून दिला पण या लाल दिव्याचा मोह ना शिवसेना प्रमुखांनी बाळगला ना पक्ष प्रमुख वा युवा सेना प्रमुखांनी धरला. लाल दिव्याच्या गाड्या आपल्या कार्यकर्त्यांना भरभरुन मिळवून दिल्या, अगदी आपली अर्धी हयात काँग्रेसमध्ये घालवूनही ज्यांना त्यांच्या हाय कमांडने देण्याची दानत दाखविली नाही अशांनाही केवळ समाजकारण हाच ध्यास उराशी बाळगलेल्या बाळासाहेबांनी सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळवून दिली. अर्थात ते ही संधीसाधूच निघाले. बाळासाहेबांवर सडकून टीका करण्याचं काम मीडिया अव्याहतपणे करीत आली. पण त्याच मीडियामधल्या एक दोन नव्हे तर तब्बल सहा पत्रकारांना  संसदेत पाठवण्याचं धारिष्ट्य 
दाखवलं.
1995 साली शिवशाही सरकार आलं तेव्हा त्या पहिल्याच वर्षी बाळासाहेबांवर दोन कौटुंबिक आघात झाले. आधी तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना काळाने आपल्यातून हिरावून नेलं आणि नंतर चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांना रस्ता अपघातात आपले प्राण गमवावे लागले. बाळासाहेबांवर मधल्या काळात यशस्वी हृदय शस्त्रक्रियाही झाली. अनेक संकटं लीलया झेलणार्‍या या झुंझार सेनापतीनं 17 नोव्हेंबर 2012 रोजी या जगाचा निरोप घेतला. 17 आणि 18 नोव्हेंबर 2012 हे दोन दिवस केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या विश्वाने चमत्कार पाहिला. ज्या शिवतीर्थानं बाळासाहेबांच्या लाखोंच्या घणाघाती सभा अनुभवल्या त्याच शिवतीर्थानं हा झुंझार सेनापती आपल्या कुशीत चिरनिद्रेसाठी विसावताना पाहिला. अरबी सागरालाही लाजवेल अशा जनसागराला आपल्या या अनभिषिक्त सम्राटाला अखेरचा जय महाराष्ट्र करताना जसा पाहिला तद्वतच घटनात्मक सत्तेचं कोणतंही पद न भूषवणार्‍या पण शासकीय तोफांची अंतीम सलामी स्वीकारतांनाही अवघ्या विश्वानं पाहिला. अवघी मुंबापुरी दोन दिवस एकाच जागी थांबली होती, थबकली होती, निःशब्द झाली होती. हा खर्‍या अर्थानं अनभिषिक्त सम्राट आणि हीच विश्वविक्रमी शिवसेना म्हणजे न भूतो न भविष्यती असंच म्हणावं लागेल आणि बाळासाहेब ठाकरे हे खरे समाजवादी होते, लालू-मुलायमसारखे. ढोंगी नव्हते हे सर्वच राजकीय पक्ष मान्य करतील. बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा !!
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support