Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

दोन हजार शिवसैनिकांचे ठाण्यातून जय श्रीराम!!

कुर्ला टर्मिनसवरून विशेष रेल्वेगाडी अयोध्येकडे रवाना
दोन हजार शिवसैनिकांचे ठाण्यातून जय श्रीराम!!,कुर्ला टर्मिनसवरून विशेष रेल्वेगाडी अयोध्येकडे रवाना
शिवसेना, विहिंपला साधू-संत आखाडा परिषदेचा विरोध
साधू-संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणत असले तरी, साधू-संतांची संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेला धुडकावले आहे.  शिवसेनेवर राजकीय खेळीचा आरोप केला आहे. हे साधू-संत शिवसेनेच्या नाही तर 25 नोव्हेंबरला विहिंपच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत, असे परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले.


ठाणे । विशेष प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी गडावरील माती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येवरील स्वारीसाठी कलशात घेतली असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून गुरुवारी अवघे दोन हजार शिवसैनिक विशेष रेल्वे गाडीने अयोध्येकडे रवाना झाले.
आधी राममंदिर... नंतर सरकार, जय भवानी, जय शिवाजी, आवाज कुणाचा.. शिवसेनेचा, जय श्रीराम अशा घोषणांनी आसमंत दणाणून जाईल अशी अपेक्षा असताना फक्त दोन हजार शिवसैनिकच ठाणे जिल्ह्यातून अयोध्येकडे निघाल्यामुळे नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही अयोध्या विशेष गाडी ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रवाना झाली. ठाणे शहरातील आणि इतर भागांतील शिवसैनिक या गाडीतून निघाले आहेत. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी या अयोध्या सवारीला हिरवा झेंडा दाखवला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याअयोध्या स्वारीसाठी नुकतीच नियोजनाची बैठक ठाण्यातील शिवसेना नेत्यांबरोबर घेतली होती. शिंदे अधिवेशनात गुंतले असले तरी त्यांचे या अयोध्या मोहीमेकडे बारीक लक्ष आहे. शिंदेही 24 नोव्हेंबरला अयोध्येत दाखल होणार आहेत. खुद्द शिंदे यांनीही ठाण्यातून शिवसैनिक रवाना कऱण्यासाठी बैठक घेतली असताना अगदी मोजकेच शिवसैनिक पहिल्या गाडीतून रवाना झाल्यामुळे हे अंतर्गत राजकारण असावे अशी चर्चा आहे.
आशिया खंडात ठाणे जिल्हा पूर्वी सर्वाधिक मोठा जिल्हा होता. विभाजन झाल्यानंतर ठाणे व पालघर असे दोन जिल्हे झाले. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या ठाण्यातून इतका अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे बॅनर, झेंडे, गळपट्ट्या आदी सामग्रीही या रेल्वेने रवाना झाली आहे. गुरुवारी निघालेल्या शिवसैनिकांमध्ये 70 ते 80 उत्तर भारतीय असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support