Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

दिवाळी आणि ईद ए मिलादचा कल्याणात संगम

दिवाळी फराळ आणि शिरखुर्माचा नागरिकांनी घेतला आस्वाद 
दिवाळी आणि ईद ए मिलादचा कल्याणात संगम

  कल्याण । प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या दिवाळी आणि येऊ घातलेल्या ईद ए मिलादच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन पश्चिमेतील सर्वोदय गार्डन याठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमासह नागरिकांनी दिवाळी फराळ आणि शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रकाश पेणकर, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, डॉ. गौतम गणवीर, बाळा शेट्टी, झेबा मंजूर खान, अब्दुल जलील, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर, प्रमोद भानुशाली आदी मान्यवर उपस्थित होते. 
शिवसेनाशाखा प्रभाग क्रमांक 36 बैलबाजारतर्फे अनोख्या दिपावली व ईद-ए-मिलाद महोत्सवाचे आयोजन रविवारी सर्वोदय गार्डन येथे करण्यात आले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांना एकाच ठिकाणी दिवाळी फराळ व शिरकुर्माची मेजवानी मिळाली. तसेच प्रभागातील 150 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तर परिसरातील डॉक्टरांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर उपस्थितांच्या मनोरंजनासाठी मराठी हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 
यावेळी अनंत नेमाडे, राजू नायर, उदय देशपांडे, भाऊ सोनावणे, प्रशांत कुलकर्णी, संजय जोशी, अविनाश जगताप, संदीप सांगळे, हेमंत सांगळे, रवी मेनुगा, नुरा पिंजारी, जॉन कॅलीमेनो, सुबल डे, नूर जमादार,धीरेन देरासरी, अलीम खान, अब्दुल शेख, पोखरकर, रुबेद मजीद, बाबा फरीद, रविश शैमले, महेंद्र कुलकर्णी, शरद जाधव, जितु पवार, संतोष नवले, तन्वीर देसाई आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैल बाजार प्रभागात हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने राहत असून या दोन्ही धर्मियांना एकत्र आणण्यासाठी या अनोख्या दिपावली व ईद-ए-मिलाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे समाजांमध्ये धार्मिक सलोखा राखण्यास मदत होणार असून प्रकाश पेणकर यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support