Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

सर्वच महामंडळे एका छत्राखाली आणणार!

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आश्वासन
सर्वच महामंडळे एका छत्राखाली आणणार!,सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आश्वासन

 नवी मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणार्‍या सर्व महामंडळाच्या कारभारात एकसुत्रीपणा आणण्यासाठी सर्वच महामंडळे एका छत्राखाली आणण्यात येणार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी ऐरोली येथे स्पष्ट केले. सर्व महामंडळे एका छत्राखाली आणल्यानंतर महामंडळाकडून देण्यात येणारी कर्ज तसेच कर्ज वसुल करण्याची यंत्रणा ही एक खिकडीच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी स्पष्ट केले. 
ऐरोली येथील पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवरुन राजकुमार बडोले यांनी गुरुवारी सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि त्यांच्या यशस्वीता या विषयी माहिती देताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे, महात्मा फुले मागासवर्ग विभागाचे व्यवस्थापकिय संचालक कमलाकर फंड, लिडकॉमचे राजेश डाबरे, समाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सोळंकी, पार्थ नॉलेज नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष बबन मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.   
यावेळी बडोले यांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र अनुसूचित जाती अधिनियम हा विशेष कायदा करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर विशेष घटक योजना तसेच इतर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी असलेला निधी इतर विभागाकडे वळविता येणार नाही. तसेच सदर निधी व्यक्तीगत देखील होणार नसल्याचे स्पष्ट केले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support