Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

मुंबई विकास आराखड्याची कोटींची उड्डाणे

मुंबई ही महानगरी आहे... तिचा प्रारूप आराखडाही महान आणि महागच असणार यात शंका नाही. मात्र, एकाच गोष्टीवर दोनदा खर्च करून मुंबईकरांच्या घामाच्या पैशाचा अपव्यय करणे कितपत योग्य आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा हा मुंबईचे भविष्यातील चित्र रंगवणारा आहे. भविष्यात मुंबई कशी दिसणार आहे, तिचा विकास कोणत्या अंगाने होणार आहे. ती किती उंच जाणार असून श्वास घेण्यासाठी कोणत्या मोकळ्या जागा शिल्लक राहणार आहेत. त्या खरंच किती प्रमाणात शिल्लक राहणार आहेत, याची अधिकृत ब्ल्यू प्रिंट म्हणजे हे विकास आराखड्याचे प्रारूप आराखडा तयार करताना मुंबईचा सांगोपांग विचार झाला असणारच. मात्र, एकदा तयार केलेला आराखडा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तयार करायला लावून सुधारित आराखडा तयार करायला लावल्याने खर्च दुप्पट झाला.
मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (2034) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आजवर 13.59 कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर आराखडा समितीवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या रमानाथ झा यांच्या पगारावर 46.55 लाख खर्च, सूचना व हरकतींच्या सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिकार्‍यांच्या मानधन आणि सुविधांवर 20 लाख खर्च करण्यात आल्याची माहिती, माहिती अधिकारातून मिळाली आहे.
मुंबईचे तत्कालीन आयुक्त सिताराम कुंटे यांच्या कारकिर्दीत तयार केलेला मुंबईचा प्रारुप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केला होता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचा प्रारुप विकास आराखडा म्हणजे डीपी (2034) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पालिकेच्या विकास नियोजन खात्याने अनिल गलगली यांस माहिती दिली की मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (2034) पुनर्रचनेसाठी आजमितीपर्यंत 13 कोटी 59 लाख आणि 56 हजार खर्च करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित केलेल्या मुंबईचा प्रारुप विकास आराखड्यावर (2034) 5 कोटी 60 लाख 5 हजार खर्च केले आहे, ज्यात 25 फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित आराखड्याच्या कामासाठी नेमलेले सल्लागार मेसर्स इजिस जियोप्लानला 3.42 कोटी अदा केले आहे. एमबी ग्राफिक्स आणि प्रिंटमोअर या कंपनीला 96 लाख, मेसर्स एडीसीसीला 1 कोटी 13 लाख, वीके पाठक सल्लागार आणि इन्फॉरमल समितीच्या सदस्यांना 7 लाख 90 हजार आणि मेसर्स विदर्भ इन्फोटेकला 2015 मध्ये स्वीकारलेल्या सूचना आणि हरकतीच्या अनुषंगाने डेटा एंट्री कामासाठी 16 लाख अदा केले आहे.
सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखड्यावर 2015 मध्ये एकूण 1.91 कोटी खर्च केले गेले आहे. विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांच्या मे 2015 पासून मे 2016 या कालावधीत वेतनावर 16.55 लाख खर्च झाले आहे आणि त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या संगणकावर 46 हजार खर्च केले आहे. कंसल्टेट फॉर डीसीआर टीमचे कांजलकर यांस 3 लाख 70 हजार आणि इंफॉर्मल समितीच्या सदस्यांना 2 लाख दिले आहे. मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे उपलब्ध केलेल्या विविध प्रकारच्या मनुष्यबळासाठी 3 कोटी 35 लाख 55 हजार अदा केले आहे. बॅटरी बॅकअपसाठी मेसर्स एनएम सिस्टमला 29 हजार अदा केले आहे.
27 मे 2016 राजी प्रकाशित सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 मध्ये 6 कोटी 8 लाख 6 हजार खर्च करण्यात आले आहे. यात विशेष कार्य अधिकारी असलेले रमानाथ झा यांस जून 2016 पासून सप्टेंबर 2018 या कालावधीत वेतन रुपाने 40 लाख अदा केले आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत प्राप्त सूचना आणि हरकतीवर आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या समितीच्या 3 सदस्यांवर 19 लाख 99 हजार ख़र्च करण्यात आले असून यात सर्वश्री गौतम चटर्जी, सुरेश सुर्वे आणि सुधीर घाटे यांचा समावेश आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत जाहिरातींवर 14.83 लाख खर्च करण्यात आले आहे तर जेवणावर 2 लाख 83 हजार खर्च करण्यात आले आहे. यात 31 जुलै 2017 रोजी महापालिकेच्या मंजूरीच्या अनुषंगाने महापालिका सदस्यांना भोजन व्यवस्थेवर 1 लाख 65 हजार खर्च करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 प्रदर्शित करण्यासाठी परवाना खरेदी करण्यासाठी मेसर्स आर्क जीआयएस सर्वर एंडहांस इंटरप्राइजेस या कंपनीला 1 कोटी 26 लाख अदा करण्यात आले आहे. सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 याचा नकाशा प्रिंटिंग करण्यासाठी 46 लाख 9 हजार मेसर्स जयंत प्रिंटरी एलएलपी या कंपनीला अदा करण्यात आले आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 च्या अनुषंगाने तातडीच्या कामासाठी 10 लाख 57 हजार खर्च करण्यात आले आहेत.
पहिला मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 व्यवस्थित तयार केला गेला असता तर टॅक्सच्या रक्कमेतून उभारली जाणारी इतकी प्रचंड रक्कम खर्च झाली नसती,अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. प्रारूप आराखड्यावर झालेला हा खर्च पाहता सामान्य मुंबईकरांचे डोळे दिपले नाही तरच नवल..हा खर्च योग्य आहे का तो वाजवीपेक्षा जास्त झालाय का या बाबींचा जरी विचार केला नाही तरी मुंबईकरांनी कराच्या माध्यमातून दिलेला पैसा योग्यच खर्च झाला पाहिजे, अशी रास्त भावना समस्त मुंबईकरांची आहे आणि त्यात काही गैर नाही. मुंबईचा चेहरा मोहरा ठरवणा-या या आराखड्यावर होणारा खर्च गृहितच आहे, मात्र, तो कशाच्या तरी आग्रहासाठी अनाठायी नसावा इतंकच.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support