Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 19, 2018

अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर यांची चौकशीची मागणी

उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळात कोट्यवधीचा घोटाळा
अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर यांची चौकशीची मागणी

 उल्हासनगर । प्रतिनिधी
उल्हासनगर पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या कित्येक वर्षांपासून गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि चिक्की घोटाळा शिक्षण अधिकारी, ठेकेदार यांच्या संगतमताने सुरू असून त्याची चौकशी करण्याची मागणी अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर यांनी केली आहे.
मालवणकर यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना 1 नोव्हेंबर 2018 लेखी निवेदनाद्वारे केली. त्याची दखल आयुक्तांनी घेऊन, महापालिकेच्या सर्व विभागांची एकत्रित खरेदी या पुढे भंडार विभागाने टेंडर काढून करावी, प्रत्येक विभागाने वेगवेगळ्या  निविदा काढू नयेत, तसे केल्यास शिस्तभंगाचा कारवाई  केली जाईल, असा आदेश 15 नोव्हेंबर 2018 रोजी काढला आहे. त्यामुळे  महापालिकेतील भ्रष्टाचारावर नियंत्रण राहिल, असे मत व्यक्त  केले  जात आहे. 
उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या शाळेत गेल्यावर कित्येक वर्षांपासून गणवेश, चिक्कीआणि शैक्षणिक साहित्य आदी खरेदीचा घोटाळा सुरू असून शिक्षण मंडळाच्या एकुण 30 शाळा आहेत. त्यातील 25 शाळा सुरू आहेत तर पाच शाळा बंद झाल्या आहेत. पण या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पट संख्येत वाढ दाखवून ठेकेदारच्या फायद्यासाठी शिक्षण अधिकारी, व कर्मचारी हे भ्रष्टाचार करीत असल्याचे उघड झाले आहे.  मनपाच्या  शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. 6 जानेवारी 2018  रोजीच्या सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांच्या अधिकृत अहवालानुसार पटावर 4665   विद्यार्थी असून त्यापैकी  2466 विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले आहे. तर  2199 विद्यार्थ्यांचे बँक खातेच उघडलेले नाही. कारण सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले तर सदर सामुग्रीची रक्कम नियमानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी लागते. टेंडर काढताना ऑगस्ट 2018 रोजी विद्यार्थ्यांची  पटसंख्या 5244 तर  ऑक्टोबरमधे  5275 दाखवून अवघ्या महिन्याभरात 700 विद्यार्थी वाढल्याचा फरक व भ्रष्टाचाराची कल्पना तत्कालीन आयुक्त गणेश पाटील यांना आल्याने  त्यांनी चिक्कीचे टेंडर काढण्यास मनाई केली होती. पहिली ते सातवी शाळेतील बोगस पट संख्या 6051 इतकी शिक्षण मंडळ दाखवते. प्रत्येक वर्गातील  मुले आणि मुली यांची पट संख्या एकसारखी दाखवण्यात आली आहे.  
खरी पट  संख्या 4775 ही असताना टेंडर मात्र 5925 विद्यार्थ्यांचे  काढण्यात आले आहे. 1340  ने वाढीव पट दाखवण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support