Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 19, 2018

सीएम चषक स्पर्धेसाठी नागोठण्यात बैठक

सीएम चषक स्पर्धेसाठी नागोठण्यात बैठक
नागोठणे । प्रतिनिधी 
पेण सुधागड नागोठणे मतदारसंघात सीएम चषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन मतदार संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी नागोठण्यात केले. 
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचे सूचनेनुसार सीएम चषक स्पर्धेनिमित्त येथील भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, सुधागड तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, जिल्हा चिटणीस राजेश मपारा, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, संकेत लाड, संदीप घरत, कृष्णा पाटील, संजय लोटणकर, रवींद्र शिंदे, अरुण वाघमारे, नारायण म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, शेखर गोळे, नितीन पत्की, योगेश म्हात्रे, मनोज शिर्के, असगर सय्यद, रऊफ कडवेकर आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोबाईल - इंटरनेटच्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढून मैदानी खेळ, जुन्या संस्कृती, विविध कला अद्ययावत व्हावी, त्यांच्यात रुजवावी तसेच ग्रामीण भागातील युवा पिढी तंदुरुस्त राहावी, या उदात्त हेतूने सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अमित घाग यांनी यावेळी सांगितले. 30 ऑक्टोबर ते 12 जानेवारी पर्यंत होणार्‍या या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कारासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्यात येणार असून आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा पेण येथे, तर जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा - पाली, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा - कणे, पेण, सौभाग्य खो खो स्पर्धा - पेण, उडाण 100 मीटर धावणे - रोहा, मुद्रा योजना 400 मीटर धावणे - रोहा, स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा - निडी पडम आणि कौशल्य भारत कॅरम स्पर्धा पाली येथे होणार आहेत. या स्पर्धांबरोबर कला विभागात उज्वल नृत्य स्पर्धा - नागोठणे, उजाला गायन स्पर्धा - पाली आणि इंद्रधनुष्य चित्रकला तसेच मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा पेणमध्ये होणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support