Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

पुण्यात गोळीबाराच्या तीन घटनांनी खळबळ

 पुण्यात गोळीबाराच्या तीन घटनांनी खळबळ

पुणे । प्रतिनिधी
शहरात बुधवारी तीन ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत चंदननगर परिसरात एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. तर दुसर्‍या घटनेत येवलेवाडी परिसरातील एका सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाला. तिसर्‍यांदा गोळीबार झाल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडली. चंदननगर परिसरातील गोळीबार करणार्‍या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलीस अधिकार्‍यावर गोळी झाडण्यात आली आहे.
चंदननगर गोळीबारातील आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या गजानन पवार यांच्यावर आरोपीने 3 गोळ्या झाडल्या. यातील 2 गोळ्या पवार यांना पोटात लागल्या. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. 
तसेच चंदननगर परिसरात 2 अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून गोळीबार केल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. एकता ब्रिजेश भाटी (34) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव शेरी येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील ज्ञानदीप या इमारतीत एकता भाटी वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळी त्या आणि त्यांचे पती घरी असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्याच्या घराचे दार वाजविले. त्यानंतर एकता भाटी यांनी दार उघडले असता, त्यातील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी थेट छातीत लागल्याने एकता भाटी यांचा जागीच मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी मृत महिलेचे पती ब्रिजेश भाटी यांनी एकता भाटी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु एकता भाटी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support