Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

अडवाणी स्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शनाला उत्तम प्रतिसाद


 मुंबई । प्रतिनिधी 
शालेय मुलांना कबड्डी खेळाचे नियम व तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभावे म्हणून स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी सहकार्याने शालेय सबज्युनियर 64 खेळाडूंचे मोफत कबड्डी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. बालक दिनानिमित्त दोन दिवस झालेल्या कबड्डी शिबिराचा समारोप हशू अडवाणी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  
गोवंडी-मानखुर्द परिसरातील शालेय कबड्डी खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार विजेते एन.आय.एस. कबड्डी प्रशिक्षक मिनानाथ धानजी, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक दीपक कांदळगावकर, अखिल भारतीय कबड्डी पंच बंडू कांबळे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक आदी मंडळीनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये कबड्डी क्रीडांगण बनवण्यापासून कबड्डीचे नियम, प्रत्येक बचाव खेळाडूंचे क्षेत्ररक्षणातील कार्य, चढाई व पकडीचे डावपेच, मैदानावर प्रात्यक्षिकांसह ‘वॉर्म-अप’ व सराव तसेच स्पर्धात्मक खेळ आदी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. शालेय खेळाडूनी दररोज दोन तास कसून सराव घेऊन खेळात शिस्त राखावी. तसेच पंचाच्या निर्णयाचे पालन करावे आणि अभ्यास देखील मन लावून करण्याचा सल्ला मार्गदर्शकांनी दिला. घाटकोपर-पंतनगर येथे 23 ते 26 नोव्हेंबरमध्ये होणार्‍या मुंबई महापौर चषक शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेनिमित्त दिवाळी सुट्टीतील हे चौथे मोफत कबड्डी मार्गदर्शन शिबीर साकारण्यात आल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support