Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

उल्हासगर पालिका सहाय्यक आयुक्तांना गुंडांची मारहाण

भाजपा पदाधिकारी कपिल अडसूळ यांची दंडेली
उल्हासगर पालिका सहाय्यक आयुक्तांना गुंडांची मारहाण

 उल्हासनगर । प्रतिनिधी
उल्हासनगर भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष कपिल अडसूळ यांच्या कार्यालयाच्या बाजूला बांधलेल्या गाळ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक आयुक्त विजय मंगलानी याना 20 ते 25 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
उल्हासनगर शहरात अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामांना राजकीय सरंक्षण असल्याने पालिका प्रशासन कारवाई करत नाही, असे वारंवार होत आहे. भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष कपिल अडसूळ यांचे कार्यालय शांतीनगर येथे गावडे शाळेच्या बाजूला आहे. या कार्यालयाच्या बाजूला अनधिकृत गाळ्याचे काम सुरू आहे. या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक सायंकाळी 5 वाजता गेले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी घेरून कारवाई करण्यास अडथळा निर्माण केला. ही बाब पथकातील कर्मचार्‍यांनी प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त विजय मंगलानी यांना सांगण्यात आली. दालनात बैठकीत असलेले मंगलानी यांनी बैठक संपल्यावर घटनास्थळी धाव घेतली.  त्यावेळी 25 ते 30 जणांनी त्यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण केली.
मंगलानींवर भ्रष्टाचाराचा आरोप
या बांधकामाला सरंक्षण देण्यासाठी मंगलानी यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते न दिल्याने ही कारवाई केल्याचा आरोप अडसूळ यांनी केला आहे. मंगलानी यांनी प्रथम मारहाण केल्याचे सांगितले. हा व्हिडीओ तुम्ही काढला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे तो आम्हाला दाखवा, त्यात तसे दिसले तर आम्ही मंगलानींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावरही कारवाई करू, अशा थेट शब्दांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी कपिल अडसूळ याना सुनावले. यावेळी भाजपच्या बड्या नेत्यांचा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला भीक घातली नाही. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support