Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

प्रभारी बीट निरिक्षकांची अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी जाऊन वसुली

प्रभारी बीट निरिक्षकांची अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी जाऊन वसुली

 भिवंडी । प्रतिनिधी
शासन दरबारी बीट निरिक्षकाचे पद नसताना भिवंडी महानगरपालिकेत प्रभारी बीट निरिक्षकांचा सुकाळ झाला असून हे बीट निरिक्षक अनाधिकृत इमारत बांधकामांच्या ठिकाणी जाऊन आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या नांवे वसुली करीत असल्याचा आरोप केला जात आहे. 
ऐन दिवाळीत शहरातील दरगाह रोड परिसरात सुरू असलेल्या  एका इमारतीचे बांधकामाचे ठिकाणी जाऊन  कायदेशीर कारवाई न करता अर्थ कारणाचा उद्देशाने बेकायदेशीरपणे कारवाई करून  करणार्‍या बीट निरिक्षकाचा व्हिडीओ शहरातील मोबाईलवर व्हायरल झाला होता. परंतू महापालिकेचा वरिष्ठ अधिका-यांनी संबधितांवर कोणतीही कारवाई न केल्याने त्याचेसुध्दा हात यात ओले होत असल्याचा आरोप नागरिकांकडून व विकासकांकडून होऊ लागला आहे.त्यामुळे महापौर जावेद दळवी यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आयुक्त मनोहर हिरे यांनी या बाबतीत सखोलपणे चौकशी करावी व बेकायदा काम करणार्‍या प्रभाग समिती अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी सुचना केली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील काम पहाण्यासाठी 1 ते 5 प्रभाग कार्यरत असून  प्रभाग समिती अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना बहुसंख्य ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बाबत गेल्या पंधरा दिवसांपुर्वी महापौर जावेद दळवीसह काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या त्यामुळे आयुक्त मनोहर हिरे यांनी गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, उपायुक्त दिपक कुरळेकर व सर्व प्रभाग अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करून तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. असे असताना प्रभाग अधिकारी व वरिष्ठ अधिका-यांनी आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देत ऐन दिवाळीत काही प्रभाग अधिका-यांच्या आदेशांवरून बीट निरिक्षकांनी इमारती बांधकामांच्या ठिकाणी जाऊन आयुक्तांच्या नावाखाली पैशांची मागणी केली. 
तसेच प्रभाग समिती क्र. 4 मध्ये दर्गारोड परिसरांत सुरू असलेल्या  इमारतीच्या  ठिकाणी विकासकाला अथवा इमारत मालकास कोणतीही पुर्वसुचना न देता  तेथील सामान पालिकेच्या वाहनात अनधिकृतपणो टाकले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support