Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

‘मी, मोबाईल आणि फॅमिली’ नाटकातून मांडली वस्तुस्थिती

‘मी, मोबाईल आणि फॅमिली’  नाटकातून मांडली वस्तुस्थिती

  ठाणे । प्रतिनिधी 
तंत्रज्ञानाचा वाढलेला अतिवापर मानवी जीवनाचा कशा पद्धतीने र्‍हास करू शकतो यावर आधारित ‘मी, मोबाईल आणि फॅमिली’ हे नाटक या रविवारी अभिनय कट्ट्यावर सादर करण्यात आले. यात मोबाईल एक व्यसन झाले असून त्याला वेळीच आवर घातला पाहिजे, हे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. यंदाचा हा 403 क्रंमाकाचा अभिनय कट्टा होता.
मोबाईलचा जन्म कसा झाला व पुढे त्याचा लोक जीवनावश्यक वस्तू म्हणून उपयोग करू लागले. तसेच या तंत्रज्ञानाने माणसाचा शंभर टक्के भाग व्यापून टाकला असून मोबाईल वेड हे व्यसनात परिवर्तित होत आहे. शरीराचा एक भाग म्हणून मोबाईलचा वापर करताना लोक अगदी झोपताना, दात घासताना आणि बाथरूममध्ये देखील मोबाईल वापरतात.
पूर्वी केवळ संवाद साधायचे माध्यम म्हणून मोबाईल वापरला जात होता. मात्र गेल्या काही वर्षात फेसबुक, व्हॉट्सअप या गोष्टींचा भडिमार मोठ्या प्रमाणात होत असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध देखील दिवसातून दर दोन मिनिटांनी सतत आपला मोबाईल चेक करत असतात. या नाटकाच्या माध्यमातून मोबाईलचा सदुपयोग व दुरुपयोग दाखवण्यात आला आहे. यात रुपाली वीरकर, अर्णव राजे, हर्षदा दाते, ऋतुजा भडसावळे, जयेश राजे इत्यादी कलाकारांनी काम केले. या नाटकाचे संगीत सिद्धेश दळवी याने केले होते. लेखन आणि दिग्दर्शन जसुराज यांनी केले होते. यावेळी कट्ट्याचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले व दीपप्रज्वलन माधव धामणकर यांनी केले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support