Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

‘एक सांगायचंय’ पालकांनो जागे व्हा

‘एक सांगायचंय’ पालकांनो जागे व्हा

मराठी चित्रपटाविषयी बॉलिवूडमधे कमालीच कुतूहल आहे. काही सेलिब्रिटी कलाकारांनी तसे बोलूनही दाखवलेले आहे. त्याच्यापाठीमागचे कारण म्हणजे हिंदीतला व्यावसायिकपणा मराठी चित्रपटात फारसा दिसत नाही. सामाजिक जाणीवेचे, भावनाप्रधान चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग मराठीत जास्त आहे. त्यामुळे इथे काम करणार्‍या प्रत्येक कलाकाराला काही वेगळे केल्याचे समाधान मिळते. अनेक कलाकारांनी मराठीत हजेरी लावल्यानंतर के के मेनन हाही कलाकार तेवढ्याच तत्परतेने सज्ज झालेला आहे. ‘एक सांगायचंय’ हा त्याचा मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्याला मराठीत आणायचे काम अभिनेता म्हणून परिचयाचा असलेल्या लोकेश गुप्ते याने केलेले आहे. भरपूर जबाबदार्‍या घेऊन लोकेशने या मराठी चित्रपटासाठी काम केलेले आहे. कथा, पटकथा, संवाद, संकलन यांच्याबरोबर दिग्दर्शनही त्यानेच केलेले आहे. प्रभाकर परब या निर्मात्याने देवी सातेरी प्रॉडक्शनच्यावतीने ही जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे. आजचा तरुणवर्ग चंगळ संस्कृतीच्या आहारी गेलेला आहे. आई वडिलांनी वेळीच या मुलांकडे लक्ष दिले नाही तर चुकीच्या मार्गाने ही मुलं जाण्याची शक्यता असते. केवळ आपले म्हणणे त्यांच्यावर न लादता मुलाची गुणवत्ता आणि त्याची आवड लक्षात घेऊन त्याला जर प्रोत्साहन दिले तर त्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते हे सांगणारा ‘एक सांगायचंय’ हा चित्रपट आहे. मल्हार रावराणे हा एक पोलीस अधिकारी आहे. रेव्ह पार्टीची त्याला कुणकुण लागते. त्यावर धाड टाकण्यासाठी गेला असताना आपला मुलगा कबीर हाही त्यात गुंतलेला आहे आणि बर्‍याचशा गोष्टींच्या आहारी गेलेला आहे याची जाणीव होते. अती दक्षता घेत असल्याचा त्रास मुलाला होतो. तो आत्महत्या करतो. त्याच्या दु:खाने व्याकूळ झालेला मल्हार कबीरच्या मित्रांच्या संपर्कात येतो आणि आपले बरेचकाही चुकले आहे याची जाणीव त्याला होते. कबीरच्या मित्रांच्या वाट्यालाही त्याच समस्या आल्याचे त्याच्या लक्षात येते. मल्हार नंतर काय करतो, हे जाणून घेण्यासाठी ‘एक सांगायचंय’ हा चित्रपट एकदा पहायला काहीच हरकत नाही. लोकेशने निवडलेली कथा यापूर्वी अनेक चित्रपटात थोड्याफार फरकाने आलेली आहे. त्यामुळे काही नवीन पहातो आहे याचा आनंद हा चित्रपट देत नाही. पण, या चित्रपटाची जमेची बाजू काय असेल तर दिग्दर्शकाने त्यातला गंभीरपणा अभिनयातून, संवाद लेखनातून जपलेला आहे. प्रत्येक पालकाला आपल्याच कुटुंबातील ही कथा आहे असे जाणवेल असा प्रयत्न दिग्दर्शकाकडून झालेला आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराने विषयातील गांभीर्य आपल्या अभिनयाने जपलेले आहे. मराठी बरोबर हिंदी कलाकार यात आहेत, ज्यांना मराठी बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. त्यांना अभिनय आणि डबींग यांचा समन्वय साधताना बर्‍याचशा तफावती जाणवतात. मल्हारची व्यक्तिरेखा के के मेननने केलेली आहे. व्यक्तिरेखेसाठी त्याने केलेली मेहनत त्याच्याबरोबर चित्रपटाचा दर्जा वाढवणारी आहे. त्याची पत्नी झालेल्या राजेश्वरी सचदेव हिच्या बाबतीतही हेच सांगता येईल. अभिजीत आमकर, शुभवी गुप्ते, शाल्व किंजवडेकर, वैभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. शैंलेंद्र बर्वे याने संगीत, पार्श्वसंगीत अशी दुहेरी जबाबदारी सांभाळलेली आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support