Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

भाजप, काँग्रेस म्हणजे सापनाथ आणि नागनाथ!

रायपूर । वृत्तसंस्था 
भाजप आणि काँग्रेस हे ‘सापनाथ’ आणि ‘नागनाथा’सारखे आहेत, अशा शब्दांत बसप प्रमुख मायावती यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेस किंवा भाजपबरोबर युती करण्यापेक्षा आपण विरोधीपक्षात बसू, असेही मायावती यांनी म्हटले आहे. 
छत्तीसगढमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांच्या पक्षाने अजित जोगी यांच्या छत्तीसगढ जनता काँग्रेस पक्षासोबत युती केली आहे.
मायावती उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसशी युती करण्याबाबत चर्चा करत होत्या. मात्र, काँग्रेसला गरीब, शेतकरी आणि कामगारांबद्दल काहीच देणेघेणे नाही, असे मायावती म्हणाल्या. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावरून मायावती आणि काँग्रेसचे एकमत झाले नाही. मायावतींना अपेक्षित असलेल्या जागा देण्यास काँग्रेसची तयारी नव्हती. परिणामी, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बसप आणि काँग्रेस युती झाली नाही. 
आम्ही बहुमतात निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. दुसर्‍या कोणाकडून पाठिंबा घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला बहुमत मिळाले नाही, तर आम्ही विरोधात बसू, पण तरीही भाजप किंवा काँग्रेसबरोबर जाणार नाही, असे मायावतींनी स्पष्ट केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support