Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 23, 2018

मुख्यमंत्रीसाहेब, पोलिसांना कामाला लावा!

कशाकशाची चिंता करायची, कशाचे भय बाळगायचे, कशाचे टेन्शन घ्यायचे हे कळेनासे व्हायची एक वेळ येते. आपल्या घरातून बाहेर पडलेला माणूस परत सुखरूप घरी येईल की नाही ही चिंता हजारो घरांमधील व्यक्तींना दररोज छळत असते. आता त्यात आपल्या लेकीबाळींच्या सुरक्षेची, त्या हातीपायी धड घरी परततील की नाही, याचे भय निर्माण होऊ लागले आहे. चिमुरड्यांपासून अगदी कोवळ्या वयातील आणि युवतीपर्यंत कितीतरी मुली घरात आणि घराबाहेरही शिकार होऊ लागल्या आहेत. जे घरी तेच दारी म्हणजे दाराबाहेर. मुली गायब होण्याचे प्रमाण मुंबईत प्रचंड वाढले आहे. अपहरण झालेल्या, हरवलेल्या मुलींच्या संख्येत 15 पटींनी वाढ गेल्या पाच वर्षांत झाली आहे. त्यात बहुसंख्य अल्पवयीन आहेत. या नकळत्या वयातील बिचार्‍या मुली जातात तरी कुठे? याची खबरबातही लागत नाही. ना पोलिसांना लागत ना त्यांच्या चिंतेने हवालदिल झालेल्या कुटुंबांना त्याची माहिती मिळत. माहिती अधिकारात समोर आलेल्या या माहितीप्रमाणे, मुंबईत सन 2013 साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या 92 इतकी होती, त्यात 2017 साली 15 पटीने वाढ होऊन, 2017 साली हा आकडा तब्बल 1 हजार 368पर्यंत पोहोचला आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनीच ही पालकांना भयव्याकूळ कऱणारी माहिती दिली आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळणार्‍या आईबापांच्या जीवाला या बातमीने नक्कीच घोर लावला असेल. कारण या मुली हरवत नाहीत तर पळवल्या जातात असेच एकूण वर्तमान आहे. या मुली नाहिशा होतात त्यामागे अनेक घटक कार्यरत असतात. ह्यूमन ट्रॅफिकींग हा त्यामागील मोठे भयप्रद काळे जग आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण 5 हजार 056 मुली हरवल्या किंवा पळवल्या गेल्या. त्यापैकी 370 मुलींचा अद्याप शोधच लागलेला नाही. अल्पवयीन मुलांचा विचार केला असता, 3 हजार 390 मुले गायब झाली होती. त्यातील 259 मुलांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ही केवळ मुंबईपुरती मर्यादित आकडेवारी आहे. उर्वरित महाराष्ट्राची आणखी दुर्दशा आहे. अनेक मुले-मुली घरातून पळूनही जातात आणि मोहनगरी मुंबईची वाट धरतात. मुंबई वा इतर कुठल्या रेल्वे स्थानकांवर उतरलेल्या या मुलांना गुंडांच्या, भिकार्‍यांच्या टोळ्या हेरून ताब्यात घेतात. काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही अशा मुलांना फलाटांवर शोधत असतात. त्यांच्या नजरेला ही मुले आली तर त्यांचे सुदैव. कारण या संस्था अशा मुलांची गाठ परत त्यांच्या मातापित्यांशी घालून देते. जी गोष्ट मुलांची तीच मोठ्या व्यक्तींचीही. 2013 ते 17 दरम्यान मुंबईतून 6 हजार 510 पुरुष आणि 2 हजार 839 महिला हरवल्या आहेत. त्यांतील 1 हजार 188 पुरुष आणि 530 महिलांचा शोध लागलेला नाही. म्हणजेच 629 अल्पवयीन मुले आणि 1 हजार 718 प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या नाहिशा होण्यामागे मानवी तस्करी करणार्‍या टोळीचा हात असावा अशी दाट शक्यता आहे. विकृत वासनांध श्वापदे तर मुंबईपासून गावखेड्यांतही हपापलेली असतात. त्यांना चिमुरड्यांचे आर्त रडणे हेलावून टाकत नाही की असहाय मुलींच्या याचना आणि यातना. मुंबईत गेल्या 3 महिन्यांत अशा 123 अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार ठरल्याची माहितीही मुंबई पोलिसांची आकडेवारी सांगते. याच तीन महिन्यांत मुंबईत 362 मुलींचे अपहरण झाल्याचेही उघड झाले आहे. त्यांपैकी 235 मुली अजूनही बेपत्ता आहेत. ही आजचीच परिस्थिती नाही. मुंबईत उतरल्यावर गायब झालेल्या इस्थर अनुयाचे प्रकरण आठवतेय? सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ही मुलगी लोकमान्य टिळक टर्मिनसला उतरल्यावर अंधेरीच्या वसतीगृहात परतलीच नव्हती. मुंबईत दर आठवडयाला 16 ते 20 वर्षे वयोगटातील दोन ते तीन मुली गायब होत असतात. आणि पोलीस त्यांच्या आईवडिलांना वाट्टेल ती असंवेदनशील उत्तरे देतात. खरे तर हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष कक्ष आहे. पण तपासकाम कोण करणार? यामुळे अनेक प्रकरणांमध्ये हरवलेल्या मुलींचे फोटो फक्त पोलिसांच्या फाईलमध्ये डकवले जातात. जी गोष्ट मुंबईत तीच उर्वरित महाराष्ट्रात असणार हे उघड आहे. मग या हरवलेल्या व्यक्तींचा, मुलींचा शोध घेणार कोण? राज्याचे मुख्यमंत्रीच आपले गृहमंत्री आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस दल काम करत असते. तेही एका मुलीचे वडील आहेत. मुलींवरील अत्याचार, अपहरण या प्रकरणांमध्ये त्यांच्यातील या पित्याने कठोर भूमिका घेऊन पोलिसांना कामाला लावावे, अशी ‘महाराष्ट्र दिनमान’ची आणि हजारो दु:खी आईवडिलांची त्यांना विनवणी 
आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support