Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

सरकारच्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी करणारी पहिली महापालिका

पुण्यात रस्त्यांवर थुंकणार्‍यांकडून तब्बल 2 लाखांचा दंड वसूल
सरकारच्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी करणारी पहिली महापालिका
  
पुुणे । प्रतिनिधी 
रस्त्यांवर थुंकणार्‍या 1 हजार 27 नागरिकांकडून महापालिकेने आतापर्यंत 1 लाख 95 हजार रूपयांचा दंड आतापर्यंत वसूल केला आहे. महापालिकेची ही मोहिम चांगलीच गाजत असून त्याचे सर्व थरातून, फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. राज्य सरकारने यासंबधीचा अध्यादेश जारी केल्यानंतर त्याची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
महापालिकेचे 180 आरोग्य निरीक्षक शहरात कार्यरत आहे. त्यांना त्याची हद्द निश्चित करून देण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारीत मुकादम व त्याची टोळी म्हणजे सफाई करणारे कामगार असतात. आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात 15 कर्मचार्‍यांची पथके स्थापन करण्यात आली आहे. या सर्वांनीच त्यांचे दैनंदिन कार्यालयीलन कामकाज सांभाळून हे थुंकणार्‍यांना धडा शिकवण्याचे काम करायचे आहे. 
या मोहिमेचे सूत्रधार असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, राज्य सरकारच्या अध्यादेशाची आम्ही प्रभावी अंमलबजावणी करत आहोत, बाकी काहीच नाही. 
या मोहिमेला कायद्याचे अधिष्ठान असून दंड म्हणून 150 रूपयांची पावती देण्यात येते. ज्याला थुंकताना पकडले त्याच्याबरोबर नम्रपणे वागायचे असे स्पष्ट आदेश सर्व कर्मचार्‍यांना दिले आहेत. पावती द्यायची, त्याला बादलीत पाणी व फडके किंवा झाडू द्यायचा, नम्रपणेच स्वच्छता करायला सांगायचे असे सांगण्यात आले आहे. वाद, भांडणे होऊ नयेत हेच यामागचे कारण आहे.नोव्हेंबर 2 पासून मोहिम सुरू करण्यात आली. शहरातील सर्व प्रमुख चौक, सिग्नल्स, रस्ते यावर प्राधान्याने काम करण्यात येत आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support