Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

वाजे पाऊल आपले टिळक आणि आगरकर

वाजे पाऊल आपले टिळक आणि आगरकर

मराठी रंगभूमीला ज्या नाट्यसंस्थेने समृद्ध केलेले आहे त्यात साहित्य संघ मंदिर याचा मोठा वाटा आहे. संगीत नाटकांबरोबर अनेक वैविध्यपूर्ण नाटक देण्यात संघाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. मधल्या काळात निर्मिती करणे थोडेसे लांबणीवर पडले होते. जयंत सावरकर, कौस्तुभ सावरकर, डॉ बाळ भालेराव यांनी पुढाकार घेऊन पुन्हा नव्याने नाटकाची निर्मिती करण्याचे ठरवलेले आहे. अर्थात, पुनर्जिवीत नाटकाला या संघाने प्राधान्य दिले आहे. ‘वाजे पाऊल आपले’ व ‘टिळक आणि आगरकर’ ही ती दोन नाटके आहेत. साधारण 1967 मधे प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर यांचे वाजे पाऊल आपले हे नाटक रंगमंचावर आले होते. दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, मंगला संझगिरी आणि जयंत सावरकर यांचा या नाटकात सहभाग होता. आता नव्या संचात हे नाटक दाखल होत आहे. 24 नोव्हेंबरपासून हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर येत आहे. सावरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलेले आहे. अभिजित चव्हाण, पौर्णिमा तळवळकर, अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर, दिपकार पारकर यांचा यात सहभाग असणार आहे. टिळक आणि आगरकर हे नाटक विश्राम बेडेकर लिखित असून तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने हे नाटक रंगमंचावर आणले होते. आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले जात असले तरी त्याचे स्वरुप थोडेसे बदललेले आहे. अभिवाचनाच्या स्वरुपात त्याचे प्रयोग केले जाणार आहेत. उन्मन बांदकर, अंगद म्हसकर, मिथिला मुरकुटे, कौस्तुभ सावरकर यांचा प्रामुख्याने यात सहभाग असणार आहे. श्री नाट्यरंग कर्जत यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. एकंदरीत काय तर प्रेक्षकांना साहित्य संघाची दर्जेदार कलाकृती यानिमित्ताने पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना नाटक पहाता यावे यासाठी त्याचे दर डॉ भालेराव नाट्यगृहात कमी ठेवण्यात येणार आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support