Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 19, 2018

मनसेचा आज ठाण्यात महामोर्चा

मनसेचा आज ठाण्यात महामोर्चा

 ठाणे । प्रतिनिधी
लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर युती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात मनसेने आज ठाण्यात महामोर्चाचे आयोजन केले असून यावेळी मनसे शक्ती प्रदर्शन करणार आहे. ‘कुठे गेले अच्छे दिन’ या टॅगलाईनखाली मनसेने जोरदार कमबॅक केले असून या महामोर्चाचे नेतृत्व ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव करणार आहेत. दरम्यान, अविनाश जाधव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाही ठाण्यात रंगत आहेत.  तीन हात नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 30 ते 35 हजार मनसैनिक संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
मनसेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ठाणे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या असून शांततेत मोर्चा काढावा असे आवाहन केले आहे. मनसेने या अतिविराट मोर्च्याचे जय्यत तयारी केली असून ठाण्यात जागोजागी सरकारच्या विरोधात आक्रोश फलक लावण्यात आले आहे. 
ठाणे पोलिसांनी धाडल्या मनसैनिकांना नोटिसा
मनसेच्या अतिविराट महामोर्चामध्ये हजारो मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चाच्या आधी ठाणे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. मोर्चा शांततेत व्हावा आणि कायदा, सुव्यवस्थेचे पालन करण्याचे या नोटीशीत म्हटले आहे.
कसा असेल मोर्चा?
आज, सोमवारी दुपारी 1 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार असून तीन हात नाका-हरिनिवास मार्ग-तीन पेट्रोल पंप-तलावपाळी-कोर्ट नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्गक्रम असणार आहे. यावेळी सभा देखील होणार असल्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे, राजू पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support