Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

पहले राम मंदिर म्हणणारी शिवसेना

बॅकफुटवर
पहले राम मंदिर म्हणणारी शिवसेना,बॅकफुटवर
उद्धव ठाकरेंच्या सेनेला कायद्याची धास्ती
मुंबई । प्रतिनिधी
‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार,’ असा नारा देत अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी निघालेली शिवसेना आता बॅकफुटवर आली आहे. येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असले तरी या नियोजित दौर्‍यावर वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर एक-दोन दिवसांत पुढील भूमिका जाहीर करू, अशी एक पाऊ ल मागे घेणारी भूमिका उद्धव यांनी मंगळवारी मांडली. ‘ राम मंदिराचा विषय संवेदनशील आहे, याची मला कल्पना आहे. यासंदर्भात न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र कायद्याच्या कक्षेबाहेर जावून काही करायला जात नाही, अशी कोलांटउडी उद्धव ठाकरे यांनी मारली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा समोर आणून ‘पहिले रामराम, मग आराम’, असा टीकेचा सूर भाजपाने लावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयात तयार करण्यात आलेल्या अद्ययावत पत्रकार कक्षाचे उद्घाटन मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी उद्धव यांनी आपल्या अयोध्या दौर्‍याच्या पूर्वतयारीवर बोलण्याऐवजी कायद्याची भाषा सुरू केल्याने शिवसेनेच्या निवडणूकपूर्व राजकारणावर चौफेर टीका होत आहे.
ज्यांना रामाबद्दल श्रद्धा आहे. त्या सर्वांनी राम मंदिराच्या प्रश्नावर एकत्र यावे. ‘तेरे कमीज से मेरी कमीज भगवी कैसी’असा विषय उपस्थित करू नये, असे आवाहन करताना उद्धव यांनी विश्व हिंदू परिषदेवर टीकास्त्र डागले.
24 नोव्हेंबरला अयोध्येत सायंकाळी 6 वाजता शरयू नदीची महाआरती. त्याचवेळी त्याचदिवशी महाराष्ट्रासह देशभरातील सर्व मंदिरांत राममंदिर उभारणीला पाठिंबा अशा भरगच्च कार्यक्रमाची तयारीही शिवसेनेने केली आहे. त्यासाठी खासदार संजय राऊ त, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षप्रमुखांच्या दौर्‍याचा तामझाम ठेवण्याची जबाबदारीही शिवसेना भवनात देशभरातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सोपवण्यात आली. मात्र राम मंदिर प्रश्नावर अचानक पक्षप्रमुखांनीच तलवार म्यान केल्याचे सूचित केल्याने शिवसैनिकांतही संभ्रही वाढला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support