Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 19, 2018

मेगाब्लॉकमुळे केडीएमटीची दिवाळी

 6 तासांत अडीच लाखांचे उत्पन्न
मेगाब्लॉकमुळे केडीएमटीची दिवाळी

डोंबिवली ।  प्रतिनिधी
कल्याण येथील पत्रीपूल हटवण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या दरम्यान, डोंबिवली ते कल्याण रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. मात्र या काळात प्रवाशांचे हाल होऊ नये याकरता कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ज्यादा बसगाड्या सोडण्यात आल्या. या 6 तासात केडीएमटीला जवळपास अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.  
पालिकेच्या परिवहन सेवेने रविवारी सकाळी साडे आठ वाजल्यापासून कल्याण ते डोंबिवली आणि डोंबिवली ते कल्याण मार्गावर बससेवा सुरू केली होती. शहरातील सर्व मार्गावरील काही बसेस या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. केडीएमटीच्या सुमारे 40 बसेससच्या या मार्गावर 128 फेर्‍या झाल्या. तर एसटी महामंडळाच्या 4 एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर धावत होत्या. एसटीच्या या मार्गावर 19 फेर्‍या झाल्या. नेहमीप्रमाणे डोंबिवली ते कल्याण आणि कल्याण ते डोंबिवली असे प्रवासी भाडे 10 रुपये आहे. बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशंनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात बस थांब्याजवळ लांबच लांब रांगा लावल्या होत्या. प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, सदस्य संतोष चव्हाण, संजय राणे, प्रसाद माळी यांसह शाखाप्रमुख संदीप नाईक, शिवसैनिक सुयोग चवाटे, भाजप विभाग अध्यक्ष आशितोष तिवारी, दिपेश घोले, सिद्धेश शिवाळी, सुनील गुप्ता, परिवहन उपक्रम वाहतूक निरीक्षक श्याम पोस्टे, मदतनीस गोरखपूरी, यासह कंट्रोलर संदीप भोईर आणि मंगेश साळवी या दोन मदतनीस आदींनी मेहनत घेतली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support