Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, December 8, 2018

माझ्या भिमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर!

 अकोला जिल्ह्यातील अंध कुटुंबाची बाबासाहेबांना अनोखी स्वरांजली
अकोला जिल्ह्यातील अंध कुटुंबाची बाबासाहेबांना अनोखी स्वरांजली,माझ्या भिमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर!

संदीप अंभोरे । मुंबई
‘आले कीती गेले सारे चकनाचूर झाले, कोण म्हणतो देश आमचा आहे नोटावर, खरं खोटं काय तुम्ही ठेवा ओठावर, अन् माझ्या भिमानं देश उचलला, एका पेनाच्या टोकावर’ या सारख्या गीतांनी अकोला जिल्ह्यातील एका अंध कुटुंबाने गुरुवारी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अनोखी स्वरांजली वाहिली.
‘होता लाखामध्ये एक सुभेदाचा तो लेकं, त्याच्या नावाचा होता दरारा, त्याच्या पेनाले माय वं थरर्र कापे भारत सारा’, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाय नोटाला, माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’, ‘ओ बात करो पैदा तुम अपनी जुबानो, दुनिया भी कहे कुछ है, इन भिन दिवानो मे’, अशा गीतांनी गुरुवारी चैत्यभूमीवर अकोट तालुक्यातील धामणगाव चोरे येथील आकाश इंगोले, नंदकुमार इंगोले, साहेबराव पातोडे, आम्रपाली पातोडे या चार अंध कुटुंबियांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अनोखे अभिवादन केले.  
आकाश इंगोले, आपला भाऊ नंदकुमार, बहिण आम्रपाली आणि जावई साहेबराव पातोड यांच्यासह दरवर्षी चैत्यभूमीवर आपली कला सादर करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कला सादर करून मिळालेल्या पैशातूनच आमचे घर चालते, असेही त्यांनी सांगिते. अंध असल्यामुळे कामधंदा होत नाही त्यामुळे गीत-संगीताच्या माध्यमातूनच आमचा संसार चालतो. ज्या ठिकाणी असे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आम्ही आमची कला सादर करण्यासाठी जातो आणि कार्यक्रम नसेल तेव्हा अकोला ते बडनेरा दरम्यान रेल्वेत खेळणे विकण्याचे काम करतो, असेही आकाश इंगोले यांनी सांगितले.
गावागावात भीम गितांचे कार्यक्रम करून आम्ही आमचा प्रपंच चालवतो. शंभर टक्के आंधळे असूनही आमच्यापैकी फक्त नंदुभाऊलाच 600 रुपये सरकारी पेंशन मिळते. मी दोनवेळा पेन्शनसाठी अर्ज केला होता, परंतू तो अर्ज तहसीलदारांनी फेटाळून लावला. अडीच एकर शेती असल्याचे कारण पुढे करत त्यांनी पेन्शचा अर्ज फेटाळला होता.-आकाश इंगोले
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support